पुणे : पुणे-बंगळूरु महामार्गावर, वेद विहारसमोर रविवारी रात्री एका भीषण अपघातात MH 12 QR 4621 क्रमांकाची रिक्षा रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात रिक्षाचालक, गणेश कोळसकर (वय ३५), रिक्षातच अडकून पडले. मात्र, आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच वारजे अग्निशमन दल, NDA अग्निशमन केंद्राची फायर गाडी, आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने स्प्रेडर कटरच्या साहाय्याने रिक्षेत अडकलेल्या गणेश कोळसकर यांचे दोन्ही पाय मोकळे केले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर, कोणतीही वेळ न घालवता त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
या बचावकार्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अपघातग्रस्त रिक्षा तात्काळ रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. अग्निशमन अधिकारी सुनील नामे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले. या टीममध्ये फायरमन विजय स्वामी, बाळू तळपे, आशिष सुतार, कोंडीबा झोरे, भंडारी, जांभळे तसेच ड्रायव्हर गोडसे, कलशेट्टी आणि चौरे यांचा मोलाचा सहभाग होता.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Read moreDetails