मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीने आज कांदिवली पश्चिमेकडील चारकोप गावाजवळील झोपडपट्टी लगतच्या रस्त्यावर अनोखे आंदोलन केले. महापालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा निषेध करत, कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये चक्क लहान होड्या सोडून आपला संताप व्यक्त केला.
हे प्राथमिक आंदोलन संपूर्ण मुंबईत महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीने महापालिकेला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर येत्या महिन्याभरात महापालिकेकडून खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही, तर त्यांच्या अधिकाऱ्यांनाच खड्ड्यात घालण्याचे काम वंचितच्या वतीने केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या सूचनेनुसार, उत्तर मुंबई महासचिव आशाताई मगर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी शांताबाई लिंगायत, संगीता प्रधान, रंजना खरात, मीना पवार, छाया माघाडे, शशिकला गवळी, मीना आंबोरे, जयश्री मस्के, अनिता खरात, पुष्पा मोरे, वनिता घाडगे, राधा डोके यांसह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले
पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपले फासे टाकले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी दोघांना तब्बल...
Read moreDetails