कोनाळी – कोनाळी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त २०२३ मध्ये लावण्यात आलेला पंचशील झेंडा हटवण्याचा आदेश सीईओ यांनी दिल्याने संतापाचा भडका उडाला आहे. वंचित बहुजन आघाडीसह बौद्ध समाजात याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या कृत्याला “जातीय द्वेषातून प्रेरित अपमान” असे संबोधण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम भाई यांनी आज घटनास्थळी भेट देत पीआय साहेबांशी चर्चा केली आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी उपस्थित समाजबांधवांना धीर देत संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान प्रविण सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आयबु कुरेशी, व्यंकट सूर्यवंशी, संदेश सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, शिव्हार भीक्का आदींसह कोनाळी येथील अनेक बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो किंवा पंचशील झेंडा हटविण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जातीय अन्यायाविरोधात बौद्ध समाज आता शांत बसणार नाही, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.