मुंबई : मुंबईतील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, आज (१७ जुलै २०२५) वंचित बहुजन महिला आघाडीने भांडुप येथे एस विभाग महापालिकेच्या लगतच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये हार, फुले आणि ‘बीएमसी’ (बृहन्मुंबई महानगरपालिका) नावाच्या होड्या सोडून अनोखे आंदोलन केले. हे खड्डे केवळ भांडुपमध्येच नसून संपूर्ण मुंबईभर पसरले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आजचे हे आंदोलन वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी महिला आघाडीच्या मुंबई सदस्य काजल वानखेडे, रंजना कांबळे, कमल गायकवाड, सीमा इंगळे, राजकन्या सरदार, कविता गायकवाड, भारती मोरे यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आंदोलकांनी महानगरपालिकेला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. जर येत्या महिन्याभरात हे खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले नाही, तर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याच खड्ड्यांमध्ये घालण्याचे काम वंचित बहुजन महिला आघाडी करेल, असा इशारा स्नेहल सोहनी यांनी दिला.
मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा हा नागरिकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमुळे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांमध्ये भर पडते. वंचित बहुजन महिला आघाडीने पुकारलेल्या या आंदोलनामुळे आता तरी महानगरपालिका खड्डे बुजवण्यासाठी ठोस पावले उचलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”
गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...
Read moreDetails