मुंबई : सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर सात दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते, मात्र अद्यापही गुन्हे दाखल झाले नसल्याचे वंचित बहुजन आघाडीने ट्विटर हँडलवरून म्हटले आहे.
या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी (Vijayabai Suryawanshi) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नाही, तर न्याय मागायचा कोणाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारे आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही विजयाबाई सूर्यवंशी यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने या ट्विटद्वारे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी केली आहे. मात्र, न्यायालयाने आदेश देऊनही आरोपींवर गुन्हा दाखल झालेला नसल्याने पुन्हा एकदा सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील न्याय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेना आणि शिवसेना युतीला पाठिंबा नाही!
संविधानविरोधी शक्तींसोबत युतीचा निषेध!मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या...
Read moreDetails