नांदेड : मी अंगीकारलेले समाज सेवेचे व्रत हे मला माझ्या वडिलांकडून मिळालेली देणगी असून ते मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत निभावणार असल्याची ग्वाही सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, परखड वक्ते, पत्रकार व सामाजिक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी दिली.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा ६१ वा वाढदिवस प्रयागगंगा निवास, विजयनगर तरोडा बु. नांदेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.
अ. भा. गुरु रविदास समता परिषद, राष्ट्रीय ढोर समाज संघटना, अ. भा. बहुजन समता परिषद, नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशन, साईप्रसाद फाउंडेशन आदी संस्था व संघटनांच्या वतीने या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, साहित्यिक व सामाजिक लिखाण, पत्रकारिता या माध्यमातून मी महाविद्यालयीन जीवनापासूनच समाज सेवेचे कार्य सुरु केले. माझे वडिल पुरस्कार विजेते गंगाधरराव देगलूरकर हे कामगारांसाठी लढणारे आक्रमक नेते व सामाजिक बांधिलकी जोपासणारे लढाऊ कार्यकर्ते होते.
त्यांचे ते धाडसी कार्य मी जवळून पाहत होतो. तोच वारसा मी स्वीकारला असून शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत व अखेरच्या श्वासापर्यंत हे समाजकार्य मी निरपेक्षपणे करणार आहे. समाजसेवे बरोबरच समाज परिवर्तन हे आपले अंतिम उद्दिष्ट आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय ढोर समाज संघटना व समता परिषदेचे प्रदेश महासचिव नामदेव फुलपगार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवानंद जोगदंड (साईप्रसाद फाऊंडेशन), नामदेव फुलपगार (प्रदेश महासचिव, समता परिषद), साहेबराव ढगे (मनपा क्षेत्रीय अधिकारी), भीमराव वाघमारे (समता परिषद कर्मचारी संघटना), किरणकुमार हिवरे (राष्ट्रीय ढोर समाज संघटना), नारायण अन्नपुरे (समता परिषद कामगार आघाडी), दादाराव वाघमारे (सुरेश फूट वेअर), श्रीनिवास कांबळे (महानगर अध्यक्ष), सौ. प्रियंका देगलूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रशासनाला इशारा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात रेशन धान्याच्या अपुऱ्या पुरवठ्यावरून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या तीन...
Read moreDetails