Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 31, 2024
in बातमी
0
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !
       

उत्तर अमेरिकेतील ‘आंबेडकराईट असोसिएशनचा’ विशेष पुरस्कार प्रदान

चिपळूण : दलित पॅंथरचे सहसंस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कर्तृत्वावर दिनांक 25 मे 2024 रोजी जागतिक मोहर उमटविण्यात आली आहे. नॉर्थ अमेरिकेतील “आंबेडकराईट असोसिएशन ” या संस्थेचा 2024 सालचा विशेष पुरस्कार भारतातील सुप्रसिद्ध लेखक ज. वि. पवार यांना त्यांच्या अनुपस्थितीत देण्यात आला .

आंबेडकराईट असोसिएशन ऑफ नोर्थ अमेरिका (AANA ) ही संस्था दरवर्षी सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या एका व्यक्तीस डॉ. आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी ज. वि. पवार यांनी उद्दीपित केलेल्या चळवळीचा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा तसेच समाज उन्नयनासाठी दिलेल्या जगभरातील व्याख्यानांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे . हा पुरस्कार म्हणजे पवार यांनी प्रगल्भित केलेल्या आंबेडकरवादाचा सन्मान आहे. ज.वी. पवार यांनी आंबेडकरवादाची कधीही कास सोडली नाही. उभे आयुष्य त्यांनी केवळ आंबेडकरवादाची जपणूक केली आहे .

ज . वी. पवार यांची ग्रंथसंपदा मराठी, हिंदी, इंग्रजी व भारतातील अनेक प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध झाली असून अनेक विद्यापीठातील अभ्यासक त्यांच्या चळवळीवर व साहित्यावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांच्या कवितांचा आणि ग्रंथांचा समावेश अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आजही ते सतत क्रियाशील असून आंबेडकरवादी चळवळीत अत्यंत सक्रिय आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने अपरांत साहित्य कला प्रबोधिनी या साहित्य विषयक संस्थेचा उदय झालेला आहे. त्यांना मिळालेल्या या जागतिक पुरस्काराबद्दल आंबेडकरी चळवळीतून तसेच समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


       
Tags: ambedkriteDalit PanthersdalitmovementJ.V.Pawar
Previous Post

मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही ?

Next Post

आंबेडकरी विचारांशी प्रमाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही..!

Next Post
आंबेडकरी विचारांशी प्रमाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही..!

आंबेडकरी विचारांशी प्रमाणिक राहूया, लढाई अजून संपलेली नाही..!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
बातमी

वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

by mosami kewat
September 3, 2026
0

वडवणी, बीड : बीड जिल्ह्यासह वडवणी तालुक्यात पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप...

Read moreDetails
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

September 3, 2026
पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

September 3, 2026
अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 2, 2026
पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

September 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home