युग प्रवर्तक, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे या भारत देशाचे जनक व संविधानाचे शिल्पकार आहेत, तसेच आपण जर अध्ययन कराल तर बाबासाहेब हे एक असे क्रांतिकारी नेते व समाजसुधारक आहेत ज्यांनी गुलामाला गुलामीची जाणीव करून देऊन प्रत्येक व्यक्तीला एक आत्मभान व आत्मसन्माननाने जगता यावं यासाठी त्यांनी एक मोठा यशस्वी लढा देऊन व लोकशाही शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचावी या करीता आयुष्य वेचलं आहे.
बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विश्वविद्यालय, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज इन् मधून आपलं संपूर्ण शिक्षण करून भारतात येतात तर त्या वेळेला त्यांचा सारखा बुद्धिजीवी आणि अर्थतज्ज्ञ जगात कुठेही सापडणार नाही, त्यांनी १९१९ साली दिलेली निर्णायक SouthBorough Commission समोरील साक्ष हि एवढी प्रभावी आणि प्रबळ होती, कारण ती भारताच्या स्वतंत्र लढ्याला कलाटणी देणारी ठरली व त्याचं रूपांतर Government Of India Act 1919 मध्ये झाले व पुढील देशाच्या स्वतंत्र आणि संविधान निर्मितीच्या कार्यात व राजकारणात बाबासाहेब हे एक थोर नेते ठरतात, ब्रिटिशांना त्यांच्याच देशात जाऊन त्यांच्या चुकीच्या धोरणावरती आपलं Doctoral Thesis व Economic papers ते लिहितात, १९३०-३१-३२ साली गोलमेज परिषद मध्ये St. James Palace लंडन येथे ब्रिटिश सरकार वरती सडेतोड प्रहार करतात व गांधी यांना वास्तविकतेचा आरसा दाखवतात (पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदे मध्ये गांधी नसतात) आणि काही वर्षांनी पुढिल १९३७ च्या निवडणुकीत बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष हा बॉम्बे विधानसभेत अनेक जागा निवडून आणतो व अमरावती च्या जागेवरून पंजाबराब देशमुख हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे सरचिटणीस देखील चळवळीतून पक्षा कडून निवडून येतात आणि त्या पुढिल कार्य हे भारताच्या इतिहासात खूप महत्वाचं ठरतं शेड्युल कास्ट फेडरेशन व रिपब्लिकन पक्ष हे एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आपल्याला संसदेत दिसेल.
सध्याची परिस्तिथी ही फार वेगळीच आहे बाबासाहेबांच महापरिनिर्वाण झाल्यानंतर अनेक नेते कार्यकर्ते फुटले व स्वार्थी प्रवृत्ती मुळे चळवळी चं नुकसान झालं आहे, त्यातून कुणीही धडा व बोध घेयला तयार नाही, एका काली बलाढ्य असलेली चळवळ का विखुरली गेली, कोणी फोडली आणि कुणामुळे गट तट निर्माण झाले हे सगळ्यांना माहीत आहे आणि ज्यांनी हे केलं त्या व्यक्तींची दक्षता इतिहास देखील घेत नाही, मुळात बाबासाहेबांनी चळवळ ही कुणाच्या दावणीला कधीच बांधली नाही आणि बाबासाहेब हे कधीच कोणाला लाचार देखील झाले नाहीत.
देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र मिळालं पण काही लोकांनी ज्यांची विचारधारा आज संविधानाचा चुकीचा वापर करून सत्ते मध्ये आहेत, त्यांनी स्वतंत्र दिन हा काळा दिवस म्हणून साजरा केला (for Reference one may read RSS it’s mouthpiece “Organiser Magazine” and it’s articles published on 14th August 1947 and there on since it’s inception).
३० जानेवारी १९४८ साली गांधी यांच्या हत्ये नंतर सरदार पटेल यांनी ४ फेब्रुवारी १९४८ साली RSS वरती बंदी घातली होती आणि एका अटी वरती ती उठवण्यात आली की RSS will follow the Union Constitution of India & Respect it’s National Flag. MS Golwalkar द्वितीय सरसंघचालक त्यावरती कबुली आणि स्वाक्षरी देतात आणि एक Non Registered संघटना कोणाच्या पाठिंब्या शिवाय मोठी होऊ शकत नाही त्याचा देखील एक इतिहास आहे.
इंग्रजी मध्ये म्हंटलं जातं की In all those years Has Anyone been close to Gandhi…..,
The Answer is Yes, The person who saved his life…With Just his Signature on the Poona Pact & went Far ahead of Time that’s none other than Dr Ambedkar. आणि दुसरी कडे त्यांची हत्या करणारे लोकं आहेत जे आज देखील खून, हत्या याचं समर्थन करतात, कुणाचा जीव घायचा अधिकार कुणाला नाही, व्यक्ती मारून त्याचे विचार नाही संपवू शकत त्यांच्या आणि आमच्या विचारधारेत खूप मोठा फ़रक आहे.
सध्या फक्त वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आहे जो सामाजिक व आर्थिक लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे व KG To PG मोफत शिक्षण, रोजगार, इतर सामाजिक धोरण या वरती आक्रमक दिसेल, बाकी सगळे फक्त सत्ते साठी उड्या मारताना दिसतील इकडून तिकडे वगैरे, आणि जे पाकिटमार पत्रकार बोलतायेत ज्यांना Ethical Journalism चं E देखील माहीत नाही ते प्रतिक्रिया देताना दिसतात की भाजपचा फायदा होईल मतांचं ध्रुवीकरण होईल आणि लेबल लावतायेत Alphabetical categorization A team, B team, Z team वगैरे त्यांना एवढंच सांगेन जनता सध्या हुशार आहे कुठल्या विचारधारेला मत देयचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं व देश अराजकतेकडे जाऊ नये याची दक्षता घ्यावी आणि कोणी कुठल्या लोकांना निवडून दिलंय आणि किती चांगले धोरण राबवलेत हे तुम्ही पत्रकार म्हणून investigative Journalism करून शोध घ्यावा, जगामध्ये अनेक तत्वनिष्ठ पत्रकार होऊन गेलेत ज्यांनी कधीही स्वतःच्या विचारांशी बेईमानी केली नाही उदारणार्थ Dr B.R.Ambedkar, Thomas Paine, Jean-Paul Marat, Joseph Pulitzer, William Hearst, Walter Lippmann आणि सध्याचे The Guardian चे माजी संपादक Alan Rusbridger ज्यांनी Edward Snowden आणि National Security Agency on illegal Global Surveillance ची न्युज ब्रेक केली होती आणि सरकार ने दबाव आणून देखील ड्राईव्हस डिस्ट्रॉय करून त्यांच्या हाती लागू नाही दिली व The New York Times ला पुढील संशोधन साठी पाठवून दिली सध्या भारतात पेड आणि पाकिटमारी पत्रकारिता सुरू आहे.
अमेरिका या देशाचे जे जनक आहेत ते देखील सत्ते मध्ये जास्त काळ बसले नाहीत व सत्तेला चिटकून राहिले नाहीत उदारणार्थ George Washington, Thomas Jefferson, John Adams, Alexander Hamilton, Samuel Adams, Benjamin Franklin, John Hancock, John Jay, Richard Henry Lee, Robert Livingston, James Madison, George Mason, Robert Morris, Peyton Randolph, Roger Sherman ह्या सगळ्यांनी आपलं कार्यकाळ संपवून दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली यातून सध्याच्या राज्यकर्त्यांनी बोध घ्यावा.
१९५० साली भारतात संविधान लागू होऊन देश प्रजासत्ताक बनला व क्रांतिकारक बदल घडवू लागले, जे जगामध्ये दुसऱ्या देशांत काही काळाने लागू झाले.
आणि म्हणून विचार केला तर प्रत्येकाला आपलं मत हे कुणाला द्यावं कुठल्या विचारधारेशी एकनिष्ठ राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न पण सध्या काही जयचंद म्हणातयेत की आम्हाला मत द्या, त्यांना सांगेन की आमचं मत हे कुणाच्या वडिलांची मक्तेदारी नाही, Our Vote is not your Father’s Monopoly that you’ll use accordingly at your disposal. बाबासाहेब यांनी संविधान सभे मधील शेवटच्या भाषणात “लोकशाही टिकवून राहील या साठी सामाजिक व आर्थिक लोकशाही ही संसदीय लोकशाही चा मूळ गाभा आहे हे स्पष्ट केलं आहे व त्याकडे आपण सर्वांनी वाटचाल करायला हवी व एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य ही संकल्पना जास्त रुजवावी” हे ठणकावून सांगितलं आहे.
लोकशाही मध्ये जनता ही मालक असते आणि त्यांनी निर्णय घेयचाय की कोण ठरेल आपला विकास करणारा व चांगले धोरण राबवणारा पक्ष (common minimum program) आणि कोणता पक्ष आपल्या धोरणातून will achieve sustainable development goals , आणि will implement various welfare policies हे बघायचंय.
आणि म्हणून RSS-BJP ला पुरून उरायची वैचारिक ताकद आंबेडकरी चळवळी मधेच आहे आणि अबकी बार अराजक शक्तींना हद्दपार व तडीपार केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही. कार्यकर्त्यांनी खोट्या प्रचाराला बळी न पडता जोमाने आपलं काम कराव आणि जास्तीत जास्त उच्च शिक्षित व स्वतःच्या फील्ड मध्ये असलेले Professional व्यक्तींना संसदेत पाठवून बदल घडवूया.
सध्या जग हे भारत देशाकडे एका संशयी दृष्टीने बघत आहे आणि सध्याच्या देशाच्या विकास आणि परिस्थिती वरती ताशेरे ओढत आहे उदारणार्थ World Economic Forum Report on India, Amnesty International Report on India, Oxfam Report, World Bank & IMF Report on India for Debt, International labour Organization Report on Jobless Indians, ASEAN countries Singapore institute least strategically relevant country report, Electoral Bond Scam etc.आणि बरंच काही.
शेवटी बाबासाहेब १९५२ साली म्हणतात की,
“मी माझ्या पक्षाचे झाड खडकावर लावलेले आहे. ज्यांना फळाची घाई झाली आहे त्यांनी सत्ताधारी पक्षात जावे कारण माझ्या झाडाला उशिरा फळे येतील. पण ती सकल व स्वाभीमानाची असतील, ती लाचारीची नसणार म्हणून कार्यकर्त्यांनी शांत डोके ठेवून चिंतन करून कार्य करीत राहिले पाहिजे, हळूहळू आपले कार्य वाढत गेल्यास पक्ष
प्रबळ होतो सत्ता स्थापन करण्यासाठी जरी आपण
बहुमतात नसलो तरी सत्ताधाऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी वोट बँक पॉवर म्हणून आम्ही सत्तेत सामर्थ्य व स्वाभिमान सिद्ध करु शकतो”.
आणि बाबासाहेब हे देखील म्हणालेत की बुद्धिजीवी लोकांनी पुढे येऊन देशाचं नेतृत्व करावं .
एकदा Adv. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे लोकसत्ते ला “दृष्टी” आणि “कोण” या विषयावर मुलाखत देत असताना गिरीश कुबेर त्यांना प्रश्न विचारतात की “मला तुमच्या राजकारणाकडे यावं लागेल… वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हे जे व्यक्तीमत्व आहे, त्यांच्या मागे आणि पुढे असलेलं राजकारण, की ते नेहमी असं संशयाच्या किंवा बुद्धिभेदाच्या नजरेनं का त्यांच्या कडे पाहिलं गेलं त्यावर बाळासाहेब म्हणतात,
“हो कारण का बदल घडवू शकतो ना…इकडे जो धर्मवादी आणि जातीवादी आहे त्याच्या लक्षात आलं की एक “आंबडेकर” पचवता आला नाही त्याने सगळं बदललं… दुसऱ्या “आंबेडकराला” येऊ दिलं आणि कदाचित तो त्याच मार्गाने गेला तर आपलं काय होणार आणि म्हणून आपण बघत असाल, “स्वतःला पुरोगामी म्हणणारे सगळे मला पाडण्यासाठी एकत्र असतात आणि ते धर्मवाद्यांसोबत जातात …त्या वरती कोणी लिहीत नाही, कोणी बोलत नाही, कोणी काहीच करत नाही, मग मी टार्गेट का? कारण मी फक्त एका समूहाचं राजकारण नाही करत, प्रत्येकाला संधी मिळावी व लोकशाही शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचावी या साठी प्रयत्नशील असतो.”
व त्यांचे काही वाक्य खलील प्रमाणे
“माझा तरुणांवर्ती प्रचंड विश्वास आहे, कारण ते बदल घडवून आणतील.”
“जयभीम बोलो और किदर भी चलो असं होता कामा नये”.
“जिंकलेली लढाई मला हारायची नाही…!”
-Adv. Prakash तथा बाळासाहेब आंबेडकर.
शेवटी मी एवढच सांगेन आपल्या सर्वांना बाळासाहेब आंबेडकरांना व इतर कार्यकर्त्यांना संसदेत पाठवायचं आहे आणि त्यांना शपथ/Oath घेताना बघायचंय ” I Prakash Yashwant Bhimrao Ambedkar having been elected to the House of the People …….” आपला इतिहास खूप मोठा आहे, बदल घडेल चळवळ नक्कीच पुन्हा एकदा संपूर्ण देशात सर्वव्यापी होईल व वाढेल त्या बद्दल शंका नाही. म्हणून येणारी निवडणूक ही ऐतिहासिक असेल सर्व कार्यकर्ते आणि उच्च शिक्षित उमेदवारांना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा.
नमो बुद्धाय, जय सम्राट असोक, सप्रेम जयभीम.
– सुयश काटखाडे (रमाई आणि बाबासाहेबांचे स्वाभिमानी कार्यकर्ते)