अकोला : अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या निमित्ताने निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने ३००० महिलांच्या उपस्थितीत भारतीय ७५ हजार वेळा संविधानाच्या प्रस्तावनेच्या सामूहिक पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती होती.
२६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताकाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने भारतीय संविधानाचे महत्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ३००० महिलांच्या उपस्थितीत ७५००० वेळा संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.