ॲड. प्रकाश आंबेडकर : प्रस्थापितांची बहिष्काराची मानसिकता संपलेली नाही
अकोला : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ज्यांनी बहिष्कृत समूहांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याबाबत व्यापक भूमिका मांडली. भेदाभेद संपवून सर्वांना समतेची वागणूक मिळावी असे अपेक्षित होते. पण आजही प्रस्थापितांच्या डोक्यातील बहिष्काराची भावना संपलेली नाही, असेच दिसते. महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही आणि यावर प्रसार माध्यमे देखील गप्प का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडीने अद्याप एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महाविकास आघाडीला भाजपप्रमाणे मुस्लिमांना वगळायचे असेल, तर दोघांमध्ये काय फरक आहे?प्रस्थापित राजकीय पक्ष मुस्लिमांना निवडणुकीच्या राजकारणात प्रतिनिधित्व देत नाहीत, त्यांच्यावर बहिष्कार घालतात याबाबत प्रसार माध्यमे गप्प का? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडी आणि भाजपला मुस्लिमांची केवळ मते हवी आहेत, पण त्यांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलेले नाही, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.