समन्वय समिती नेमून चौकशी करू महाविद्यालयाने दिले लेखी पत्र
हिंगोली: दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान, विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा जयघोष केला असता प्राचार्य विलास आघाव यांनी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतः हातात दंडुके घेऊन मारहाण केली होती. याचा निषेध म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा संघटक संकेत सुरळकर आणि मा.महासचिव भूषण पाईकराव यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने प्राचार्य विलास आघाव यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना महाविद्यालयातून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी थाळी बजाव आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलन होण्यापूर्वीच महाविद्यालयाने सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र की समन्वय समिती नेमून झालेल्या घटनेची चौकशी करू यामुळे थाळी बजाव आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी, महाविद्यालयाला निवेदनही देण्यात आले. यावेळी सम्यक चे जि.अध्यक्ष सिद्धार्थ खंडागळे, जि.महासचिव रोहन पंडित, तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, कपिल पाईकराव, सूरज कांबळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जि.महासचिव ज्योतीपाल रणवीर, जि.संघटक अतिखुर रहेमान युवा जि.योगेश नरवाडे या सह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.