वंचित बहुजन आघाडी ची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.
कोल्हापूर: पुणे बेंगलोर हायवे वरील टोप, शिये व संभापुर येथील रस्ता रुंदिकरण मध्ये गेलेल्या झोपडपट्टीधारकांना पर्यायी जागा व झोपडपट्टीच्या मूल्यांकना नुसार मोबदला मिळावा यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
पुणे – बेंगलोर महामार्गावर शिये, टोप व संभापूर येथे 1980 पासून वास्तव्यास असलेल्या वडार समाजाच्या शंभरहून अधिक झोपड्या 1980 पासून वास्तव्यास आहेत. मात्र, नुकतेच रस्ता रुंदीकरणा मध्ये झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश झाले. मात्र, या सर्वांना पर्यायी जागा व त्याचा मोबदला न देता झोपडपट्टी हटवण्यास सुरुवात झाली.
वांचित बहुजन आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते व जिल्हा संघटक तानाजी काळे आणि जिल्हा सचिव प्रताप तराळ, महिला आघाडीअध्यक्षा वासंती ताई म्हेतर आणि जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचने यांना याची माहिती मिळताच त्यांनी भेट देवून त्या सर्व अतिक्रमण धारकांना दिलास दिला.
तेथील अतिक्रमण धारकांना सोबत घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करून निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे चौकशीचे आदेश झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा महासचिव पुंडलिक कांबळे, जिल्हा महासचिव महादेव कुंभार, जिल्हा संघटक तानाजी काळे, जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचने, करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वासंती ताई म्हेतर, हातकणंगले तालुका अध्यक्षा गीता कांबळे, जिल्हा सचिव जयेश कांबळे, जिल्हा सचिव प्रताप तराळ , जिल्हा उपाधक्ष्य बाबासाहेब शिंगे, जिल्हा सहसचिव विश्वास फरांडे, शिरोळ ता. अध्यक्षा गीतांजली वाघ आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.