Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ख्रिस्ती बांधवांच्या निषेध मोर्चाला वंचीतचा पाठिंबा; अंजलीताई आंबेडकरांचे संबोधन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 14, 2023
in बातमी
0
ख्रिस्ती बांधवांच्या निषेध मोर्चाला वंचीतचा पाठिंबा; अंजलीताई आंबेडकरांचे संबोधन
       

ख्रिस्ती समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये 13 जानेवारी 2023 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया वरती ख्रिश्चन बांधवांनी काढलेल्या निषेध मूक महामोर्चाला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना आदरणीय अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. स्वतःला हव्या असलेल्या चालीरीती पाळण्याचे, आपल्याला हवी असलेली धार्मिक उपासना करण्याचे, धार्मिक शिक्षण देण्याचे आणि स्वतःचे विचार मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचे आहे. सरकारने धर्मांतर विरोधी केलेला कायदा हा संविधान विरोधी आहे असे आम्ही मानतो. या कायद्याच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई अथवा आंदोलनात्मक लढाई यासाठी वंचित बहुजन आघाडी अग्रस्थानी असेल असे अंजलीताई म्हणाल्या. ख्रिश्चन समाजाच्या या आंदोलनाबरोबर वंचित बहुजन आघाडी तसेच फुले-शाहू-आंबेडकरवादी सर्व आपल्या समवेत असतील असेही म्हणाल्या. कोणताही धर्म मानवतेची शिकवण देतो. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही. कोणताही धर्म हा रंजल्या गांजल्यांना जवळ करतो, त्यांना सन्मानाचे जीवन देतो. भारतातील शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शिक्षण संस्था या ख्रिश्चन समाजाने चालवलेल्या असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. भारताच्या अतिशय दुर्गम भागामध्ये शिक्षण पोहोचवण्याच्या, तसेच भारताच्या जडणघडणीमध्ये या समाजाचे खूप मोठे योगदान आहे. अंजलीताईंनी स्वतः स्त्रीमुक्ती चळवळीतील असल्यामुळे पंडिता रमाबाई यांना आदर्श मानत असल्याचे सांगितले. तसेच भारतीय संविधान वाचवण्यासाठी जे काही आंदोलने होतील त्या सर्व आंदोलनामध्ये आपण ख्रिश्चन बांधवांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे देखील त्यांनी या वेळेला सांगितले.


       
Tags: Anjalitai AmbedkarChristianMorchapuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मा. अशोकभाऊ सोनोने यांची हिंगोली जिल्हा कार्यालयाला भेट

Next Post

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन

Next Post
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता!
बातमी

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता!

by mosami kewat
July 31, 2025
0

सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड अकोला : अकोला जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती...

Read moreDetails
रशियाजवळ शक्तिशाली भूकंप आणि त्सुनामी, पाठोपाठ ज्वालामुखीचा उद्रेक!

रशियाजवळ शक्तिशाली भूकंप आणि त्सुनामी, पाठोपाठ ज्वालामुखीचा उद्रेक!

July 31, 2025
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: एक निकाल आणि अनेक अनुत्तरित प्रश्न - अंजुम इनामदार

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: एक निकाल आणि अनेक अनुत्तरित प्रश्न – अंजुम इनामदार

July 31, 2025
बीडमध्ये दहशतीचे वातावरण: मित्रानेच मित्राची बोटं छाटली; वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बीडमध्ये दहशतीचे वातावरण: मित्रानेच मित्राची बोटं छाटली; वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

July 31, 2025
AIमुळे ४० प्रकारच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार; 'हे' कर्मचारी मात्र सुरक्षित! मायक्रोसॉफ्टचा धक्कादायक अहवाल

AIमुळे ४० प्रकारच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार; ‘हे’ कर्मचारी मात्र सुरक्षित! मायक्रोसॉफ्टचा धक्कादायक अहवाल

July 31, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home