अकोला, दि. २९ – पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची तारीख वाढविण्याची वंचित बहूजन युवा आघाडीची मागणी राज्य सरकारने मंजूर केली असून १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवार तरूण तरुणीना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिली आहे.राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास आता १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.आतापर्यंत ११.८० लाख अर्ज प्राप्त झाले असले तरी मोठ्या प्रमाणात अर्जदार वंचित आहेत.अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय घेतल्याची घोषणा सरकारने केली आहे.
सरकारने तात्काळ दखल घेवून फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत ही भरतीची तयारी करणारे तरुण तरुणीच्यासाठी वंचित युवा आघाडी त्वरित मुदतवाढ निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल ह्यांना पाठविलेल्या ई मेल द्वारे केली होती.आज सरकारने निर्णय घेतल्याने राज्यभरात आंनदाचे वातावरण आहे.सरकारने पंधरा दिवस वेबसाईटवर फॉर्म विनाअडचण भरता येतील ह्याची तसदी घ्यावी, अशी माफक अपेक्षा युवा आघाडीने व्यक्त केली आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश.
9422160101