Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बार्टी आणि सामाजिक न्याय विभागातील लुटी नंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) लुटीचे कंत्राट ब्रिस्क ला – राजेंद्र पातोडे.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 30, 2022
in बातमी
0
आरक्षणाशिवाय घड्याळी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांची झालेली पद भरती रद्द करा !
       

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) मंत्री अतुल सावे आणि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांच्या खात्यात २४७ पदांच्या भरतीचे कंत्राट ब्रिक्स कंपनीला निविदेविनाच देण्यावरून नवा वाद पेटला असल्याचे सांगितले जाते. बार्टी (BARTI) आणि सामाजिक न्याय विभागातील लुटी नंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) लुटीचा कंत्राट ब्रिस्क ला बहाल करण्यात सर्वच राजकीय पक्ष सामील असून ह्याची न्यायालयीन चौकशी गरजेची आहे असे मत राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केले आहे.

विनानिविदा कंत्राट

पुणे येथील ब्रिस्क इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला विधि अधिकारी, वरिष्ठ तंत्रज्ञ, सिस्टीम अॅनॅलिस्ट, डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक सहायक, संगणक ऑपरेटर, वाहनचालक, पहारेकरी, सफाई कामगार या २४७ पदांसाठीचे कंत्राट विनानिविदा देण्यात आले आहे. ह्याच कंपनी कडून २०१४ पासून सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी मध्ये मोठी लूट सुरू आहे. विशेष म्हणजे कुठल्याही निवेदेशिवाय सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी मध्ये हजारो पदे भरली जात आहेत. कुठल्याही आरक्षणा शिवाय ही पद भरती करण्यात येते. ह्या मध्ये मोठा घोळ असून २०१४ पासून ही लूट सुरू असून राजकुमार बडोले सामाजिक न्याय मंत्री असताना २०१७ मध्ये बार्टी च्या लुटी साठी जात पडताळणी समित्या मध्ये मोठ्या प्रमाणात पद भरतीचे कंत्राट देण्यात आले होते.

विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे च्या कार्यालयासाठी बाह्य यंत्रने कडून मनुष्यबळ उपलब्ध करून देणा-या ब्रिस्क कंपनीच्या नावात संशयास्पद बदल झालेले असून निवडप्रक्रीये मध्ये मोठा घोळ आहे.

अशी कंपनीच केंद्र शासनाकडे नोंद नाही…

उद्योग उर्जा व कामगार विभागाने दि. १८.६.२०१४ रोजी शासन निर्णय काढून मे. ब्रिस्क फ़ॅसिलीटीज प्रा. लि कंपनिची निवड केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे ह्यांनी कार्यालया करिता बाह्य यंत्रने कडून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या मागणी प्रमाणे सामाजिक न्याय विभागाने दि. १९.८.२०१४ मध्ये उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या पेंनल वरील मे. ब्रिक्स फ़ॅसिलीटीज प्रा. लि. कंपनिची निवड करण्यास मान्यता दिली होती. तर बार्टी ने मात्र मे. ब्रिस्क इंडीया प्रा. ली. पुणे ह्या कंपनीला ०१.०९.२०१५ मध्ये कार्यारंभ आदेश दिला आहे. तसेच करारनामा देखील मे. ब्रिस्क इंडीया प्रा. ली. पुणे ह्यांचे सोबत केला आहे. केंद्र सरकार कडे BRISK INDIA PRIVATE LIMITED Maharashtra ही दि.23/02/2009 रोजी नोंदणी झाली आहे .त्याचा Corporate Identification Number (CIN) U74900PN2009PTC133563 आणी Registration Number 133563 असा आहे. उद्योग उर्जा व कामगार विभागाने देखील ह्या मे. ब्रिस्क फ़ॅसिलीटीज प्रा. लि कंपनिची निवड केली आहे, अशी कंपनीच केंद्र शासना कडे नोंद नाही. त्या मुळे हा सर्व प्रकार संशयास्प्द आहे. तरी ह्या वेगवेगळ्या नावापैकी नेमेकी कोणती कंपनी केंद्र शासना कडे नोंद आहे. त्याचे कर व इतर कागदपत्रे तपासली जावी.

पुरावे देऊनही कार्यवाही नाही

त्या करीता तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री बडोले ह्यांना पुराव्यानिशी तक्रार दिली होती. परंतु कार्यवाही झाली नाही. मुळात दोन वेगवेगळ्या नावाच्या ब्रिस्क कंपनी आहेत. मे. ब्रिक्स फ़ॅसिलीटीज प्रा. लि. कंपनी व मे. ब्रिस्क इंडीया प्रा. ली. पुणे ह्या कम्पनीचे नावाची नोंदणी पासून तसेच नावातील बदला विषयी चौकशी होणे गरजेचे आहे.

कारण उद्योग उर्जा व कामगार विभागाने निवड केलेली आणि सामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेल्या व बार्टी ने निवड केलेल्या कंपन्याची नावे वेगवेगळी आहेत. ह्या नावाचे बदल का झाले आहेत आणी बार्टी ने कश्याचे आधारे मे. ब्रिस्क इंडीया प्रा. ली. पुणे ह्यांचे सोबत कार्यारंभ आदेश देऊन करारनामा केला त्याची ही न्यायालयीन चौकशी गरजेची आहे. गेली अनेक वर्षें ही कंपनी अनुसूचित जातीच्या निधी आणि अधिकारावर डल्ला मारत आहे. आता तिने ओबीसी मंत्रालय कडे मोर्चा वळविला आहे.

राजेंद्र पातोडे
अकोला
9422160101


       
Tags: BARTIBRISKCorruptionobcRajendra PatodeSocial justice departmentओबीसी
Previous Post

थरकाप वाढविणारी टोळधाड

Next Post

“फुले आंबेडकरी विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया”; जेष्ठ विचारवंत डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन

Next Post
“फुले आंबेडकरी विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया”; जेष्ठ विचारवंत डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन

"फुले आंबेडकरी विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया"; जेष्ठ विचारवंत डॉ. संजय मुन यांचे प्रतिपादन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
बातमी

महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; महिलांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

by mosami kewat
August 8, 2025
0

‎‎मुंबई : महापालिकेच्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत पात्र महिलांना घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने...

Read moreDetails
शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये शरद पवार यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा - सिद्धार्थ मोकळे

शासकीय दौऱ्यादरम्यान दुबईमध्ये शरद पवार यांची दाऊदसोबत भेट झाली होती का, याचा खुलासा शरद पवार यांनी करावा – सिद्धार्थ मोकळे

August 8, 2025
पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

पातूर तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार; जिल्हा परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा

August 8, 2025
Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा

Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा

August 8, 2025
राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महात्मा फुले महामंडळ कार्यालयास निवेदन

राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महामंडळ कार्यालयास निवेदन

August 8, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home