उल्हासनगर : ५ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर मधील आंबेडकरी चळवळीतील व बहुजन समाज पार्टीच्या शहर महासचिव रेखाताई लक्ष्मण गायकवाड व त्यांच्यासोबत गायकवाड पाड्यातील व पदाधिकार्यांचा वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेण्यात आला. हा प्रवेश लिलावती हाॅस्टपीलमध्ये करण्यात आला.यावेळी प्रामुख्याने सारंग थोरात, उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे, वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा महासचिव रेखा कुरवारे, उल्हासनगर शहर अध्यक्ष महिला आघाडी रेखा उबाळे व इतर बरेच मान्यवर उपस्थित होते.