Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

mosami kewat by mosami kewat
November 5, 2026
in अर्थ विषयक, राजकीय, सामाजिक
0
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव
       

– संजीव चांदोरकर 

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल : स्वागत करूया पण फार एक्साईट नको होऊया. 

नक्कीच खूप दिलासादायक निकाल आहेत ! ज्याकडे अक्षरशः सारे जग श्वास रोखून वाट पाहत होते. 

पृथ्वीचा वेगाने उजवीकडे झुकणारा अक्ष, लगेच डावीकडे नाही वळणार. मान्य. तरी, त्या झुकण्याच्या वेगाच्या पायात बेड्या पडतील हे नक्की ! 

डोनाल्ड ट्रम्प एक व्यक्ती नाहीत, ते वंशवादी , स्वकेंद्री, खोल हृदयात इतरांप्रती तुच्छताभाव बाळगणाऱ्या , अमेरिकेत गेल्या २० वर्षात रुजलेल्या “मागा” आंदोलनाने राष्ट्राध्यक्षपदी बसवलेले नेते आहेत. गेल्या २१ महिन्यात त्यांनी अमेरिकेत देशांतर्गत आणि सर्व जगात जो उच्छाद मांडला होता त्यासाठी त्यांचा पराभव होणे ही काळाची गरज होती. 

फक्त पराभव होणे पुरेसे नव्हते तर निर्णायक , निसंदिग्ध पराभव होणे गरजेचे होते. निर्णायक विजय किंवा पराजय पॉलिटिकली लोडेड असतात. डेमोक्रेट्सना निसटता विजय मिळाला असता काल जो पोलोटिकल मेसेज तयार झाला तसा झाला नसता. 

दुसरी गोष्ट डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांनी हिरीरीने निवडणूक लढवणे यात काही विशेष नाही. पण अमेरिकन सामान्य नागरिक मतदारांनी ट्रम्प यांना धडा शिकवण्याचे मनोमन ठरवले होते. मध्यावधी निवडणुकीतील हाय टर्न आउट हा त्याचा पुरावा आहे. काही शे शहरातील नो किंग निदर्शनातील मोठा सहभाग मतांमध्ये परावर्तित झाला हे नक्की..

तिसरी गोष्ट भारतातासकट अनेक देशाना लागू होईल. भारतासकट, युरोप मधील अनेक देशात फासिस्ट, वंशवादी, अल्पसंख्यांक विरोधी राजकीय शक्ती जोम पकडत आहेत. अमेरिकन मतदारांनी आम्ही “आयडिया ऑफ सर्वसमावेशक अमेरिका’” मानतो हे ठासून सांगितले आहे. अनेक कृष्णवर्णीय,  बिगर ख्रिश्चन आणि महिला उमेदवार सिनेट मध्ये , गव्हर्नर म्हणून निवडून आले आहेत हा त्याचा पुरावा आहे.  

कालच्या निवडणुक निकालांनी हे सारे साध्य केले आहे 

तांत्रिकदृष्ट्या बघितले तर कोणत्याही देशांतर्गत होणाऱ्या निवडणुका , या त्या देशातील अंतर्गत बाब असते. पण अमेरिका या देशाची गोष्टच निराळी 

ट्रेनला इंजिन असते आणि अनेक डबे असतात. एखाद्या डब्यात काही बिघाड झाला तर त्या डब्यातील  प्रवाशांना त्रास होतो. पण इंजिन ? ते कसे धावते , कोणत्या दिशेला धावते , किती वेगाने धावते याचा पूर्ण ट्रेनवर परिणाम होत असतो. 

अनेक देशांचे डबे जोडलेल्या एका जागतिक ट्रेनचे अमेरिका गेली अनेक दशके इंजिन राहिले आहे. ते कोणत्या दिशेने जाणार याचा परिणाम डबे कोणत्या दिशेने जाणार यावर होत असतो. 

त्यामुळे अमेरिकेतील राज्यकर्ते कोण असणार म्हणजे आपल्या गाडीच्या इंजिनचा ड्रायव्हर कोण असणार हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रोखठोक भूमिका घेणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाकडे काँग्रेस आणि सिनेट ही दोन्ही सभागृहे आली आहेत. या निवडणुकांचे परिणाम दोन वर्षांनी २०२८ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांवर देखील होणार. होऊ शकते त्या निवडणुकात डेमोक्रॅटिक उमेदवार राष्ट्राध्यक्ष बनेल 

नजीकच्या काळात डेमोक्रॅटिक पक्षाकडे अमेरिकेची सर्व महत्वाची सत्तास्थाने आल्यानंतर अमेरिके बाहेरच्या जगासाठी खूप पॉझिटिव्ह बदल होतील अशी आशा बाळगणे भाबडेपणाचे होईल. 

गेल्या पन्नास वर्षात अमेरिकेत २४ राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यातील अर्धा काळ रिपब्लिकन आणि अर्धा काळ डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष झाले. काँग्रेस / सिनेट मधील बहुमत आलटून पालटून या दोन पक्षकडे राहिले. 

या दोन पक्षाच्या परिभाषेत, कशावर जोर द्यायचा कशावर नाही यामध्ये फरक आहे. पण अमेरिका महासत्ता म्हणून त्या देशाच्या अनेक धोरणात एक सातत्याचा, पक्ष निरपेक्ष, वाहता धागा राहिला आहे. हे भारतासकट सर्व जगासाठी नोंद घेण्याजोगे आहे. कालच्या निवडणूक निकालांचे खुल्या दिलाने स्वागत करतांना फार एक्साईट होण्याचे कारण नाही..

रिपब्लिकन / डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये कमीजास्त एकमत असणारे काही मुद्दे, जरी त्यांच्या प्राधान्यक्रमात फरक असला तरी..

अमेरिकेतील तगड्या ज्यू लॉबीच्या प्रभावाखाली इस्रायलची पाठराखण आणि इस्रायला शस्त्रपुरवठा करणे; 

संरक्षण सामग्रीवर भरमसाट खर्च;  पृथ्वीवरील २०० हुन अधिक लष्करी / नाविक तळ सुरु ठेवणे 

दुसऱ्या सार्वभौम देशात वेळ पडलीच तर बळाचा वापर करून जगातील राजकीय आर्किटेक्चर आपल्या इच्छेनुसार बदलणे; 

अमेरिकन डॉलरची जागतिक पातळीवर प्रभुसत्ता कायम राखणे; दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यायी चलनाचे प्रयत्न हाणून पाडणे 

युनायटेड नेशन्स (युनो) , जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ), नाणेनिधी (आयएम जागतिक बँक अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या पुठ्याखाली ठेवणे 

यात अजून भर घालता येईल 

(अमेरिकेच्या देशांतर्गत देखील कामगारांचे वेतन न वाढवणे, ट्रेड युनियन मोडून काढणे, मक्तेदारीला आळा न घालणे, वॉल स्ट्रीटला मोकळे रान देणे…अशी आर्थिक धोरणे या दोन्हीही पक्षांनी राबवली आहेत. पण तो पोस्टचा विषय नाही) 


       
Tags: americaElectionusUS Midterm Election Results
Previous Post

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

Next Post
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा
बातमी

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

by mosami kewat
November 5, 2026
0

मुंबई - राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी-कष्टकरी बांधवांकडे सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी...

Read moreDetails
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026
जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

जीडीपीच्या आकड्यांपलीकडे : सामान्य माणसाच्या आर्थिक स्थितीचे काय?

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home