अकोला : भारिप बहुजन महासंघाचे निंबा लोहारा सर्कलचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव वाकडे यांचे दुःखद निधन झाले. प्रस्थापितांविरोधात संघर्ष करून निवडून आलेले नेतृत्व म्हणून वाकडे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
विठ्ठलराव वाकडे यांच्या निधनाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वाकडे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





