श्रीगोंदा: भटके-विमुक्तांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक ‘मुशाफिरी यात्रे’चा भव्य समारोप सोहळा सोमवार, २९ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील लिंपणगांव येथील भिल्ल वस्ती (धनगर वस्ती) येथे सकाळी ११:०० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ‘उचल्या’कार व ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड असणार आहेत. तसेच, भटके विमुक्त राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव आणि उमाताई जाधव हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. (Mushafiri Yatra)
भटके-विमुक्तांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य समारोप सोहळ्याला नागरिकांनी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





