No Result
View All Result
“वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने भटके-विमुक्तांचे नेते अँड. डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड येथील युवकांकडून सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य जपत कोरोनाबाबत जनजागृती रॅली करण्यात आली. “जामखेड शहरामध्ये आणि परिसरामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव बघता,जनतेच्या मनातील कोरोना बाबतीत असलेलं भीतीयुक्त वातावरण कमी करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड शहरांमध्ये जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देन्यात आली.यावेळी लोकांनी घाबरून जाऊ नये व विनाकारण गर्दी न करता शासकीय सूचनांचे पालन करण्याचे आव्हान अँड. डॉ.अरुण जाधव यांनी केले. यावेळी जनजागृतीपर रथ बनवून कोरोना बाबतीत मागण्यांचे फलक घेऊन जागृतीपर रॅली करण्यात आली.
“कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे,मोठ्या प्रमाणावर रेमडीसीविर औषधांचा काळाबाजार होत आहे. खाजगी कोविड रुग्णाकडून मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. यावर शासनाने आळा घालावा. व जामखेड व कर्जत तालुक्यातील शासनाच्या PHC मध्ये विनामूल्य कोविड सेंटर उभारण्यात यावे,तसेच कोरोनाला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून गोरगरिबांना विनामूल्य राशन वाटप करण्यात यावे. तसेच मका ऐवजी गहू,डाळ, तेल ,यासारख्या गृहउपयोगी वस्तू देन्यात याव्यात अशा स्वरूपाच निवेदन जामखेड येथील मा.तहसीलदार साहेबांना देण्यात आले देण्यात आले.
“यावेळी लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, वंचीत बहुजन आघाडीचे जामखेड ता.अध्यक्ष आतिष पारवे, सामाजिक कार्यकर्त्या द्वारकताई पवार, वैजिनाथ केसकर, अंकुश पवार, अजिनाथ शिंदे, संतोष चव्हाण, सागर भांगरे, राजू शिंदे, राकेश साळवे, दिपक माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No Result
View All Result