मुंबई: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त, वंचित बहुजन आघाडीच्या बॅलार्ड पिअर, सीएसटी येथील केंद्रीय कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंग्याला मानवंदना दिल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रगीत गायन करून देशाप्रती आपला आदर व्यक्त केला.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये
महेश भारतीय (राष्ट्रीय खजिनदार, मुंबई व ठाणे जिल्हा समन्वयक, सम्यक विद्यार्थी आंदोलन सल्लागार), ॲड. प्रणाली कांबळे (महिला आघाडी), मनोहर सोनावणे (ज्येष्ठ कार्यकर्ते) यांच्यासोबतच अनिकेत मोरे, सुरेंद्र बनसोडे, आम्रपाली तांबे, मिलिंद लहाने, रविंद्र खरे, विशाल जौजाळ, माधव शिंदे, मनोज मर्चंडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

मुंबईतील बॅलार्ड पिअर परिसरातील केंद्रीय कार्यालयात सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली. संविधानाच्या रक्षणाची आणि लोकशाही मूल्यांच्या संवर्धनाची शपथ घेत हा दिवस साजरा करण्यात आला.






