नागपूर : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद नागपूर जिल्ह्यात उमटत आहेत. सध्या जल्लोषाचे वातावरण झाले आहे.
खापरखेडा येथील जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात आणि मिठाई वाटप करून हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली. “वंचितचा एक तरी नगरसेवक आहे का?” असा उपहास करणाऱ्यांना या निकालाने चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
“वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून ती सत्तेच्या जिन्यावरून चढणारी संधीसाधू पार्टी नाही. ही तर रस्ते, आंदोलन आणि संघर्षातून उभी राहिलेली खरी फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळ आहे,” असे प्रतिपादन सहारे यांनी केले.
हा विजय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या सक्षम नेतृत्वाचा तसेच कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीचा परिणाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. “वंचितला मिळालेली ओळख ही सत्तेच्या भिक्षेतून मिळालेली नसून, कार्यकर्त्यांच्या घामातून आणि बलिदानातून निर्माण झाली आहे. सामान्य माणूसही सत्तेचा वाटेकरी होऊ शकतो, हा विश्वास या विजयाने पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे,” असेही सहारे म्हणाले.

या जल्लोष कार्यक्रमाला जिल्हा व तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये कविता मेश्राम, छाया सहारे, माया पाटील, सीमा वाहने, शकुंतला मेश्राम, बालिता चिमणकर, यामध्ये वैभव येवले, शुभम वाहने, गंगाधर पाटील
कार्यकर्त्यांमध्ये उमेश दांडगे, नरोत्तम मडकवार, मुकेश वासनिक, अंबादास भौतकर, कमलेश सहारे, मुन्ना मेश्राम, सोनू पाटील, आनंद बागडे, मिथुन सहारे, मुकेश बोरकर, अक्षय बोरकर यांचा समावेश होता. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी ‘जय भीम’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.





