औरंगाबाद: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे.
प्रभाग क्रमांक २३, विश्रांती नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

परिवर्तनासाठी ‘वंचित’ला संधी द्या: सुजात आंबेडकर
रॅलीच्या समारोपानंतर आयोजित कॉर्नर सभेत सुजात आंबेडकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. “शहर आणि उपनगरांचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर आता हक्काच्या माणसांना सत्तेत पाठवणे गरजेचे आहे.
औरंगाबादच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
औरंगाबादमध्ये ‘वंचित’ची गर्जना; सुजात आंबेडकरांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
थेट संवाद आणि जनसामान्यांच्या समस्या
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ रॅली न काढता सुजात आंबेडकर यांनी कॉर्नर सभेच्या माध्यमातून विश्रांती नगरमधील रहिवाशांशी थेट चर्चा केली.

नागरिकांनी आपल्या प्रभागातील समस्या आणि अपेक्षा त्यांच्यासमोर मांडल्या. या संवादादरम्यान सुजात आंबेडकर यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.
उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शक्तिप्रदर्शन
विश्रांती नगर भागातून निघालेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
मोठा जनसमुदाय आणि तरुणांच्या उपस्थितीमुळे या रॅलीचे रूपांतर मोठ्या शक्तिप्रदर्शनात झाले. औरंगाबादमध्ये बदलाचे वारे वाहत असून, विकासासाठी ‘वंचित’ला एक संधी देण्याच्या निर्धाराने नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.






