औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून, वंचित बहुजन आघाडीने शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. प्रभाग क्रमांक २०, इंदिरा नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली.
यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आयोजित कॉर्नर सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “शहराच्या आणि उपनगरांच्या सर्वांगीण विकासासाठी आता बदलाची गरज आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि औरंगाबादच्या हक्काच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या.”
एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात – सुजात आंबेडकर
त्यांनी यावेळी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
रॅलीला जनसमुदायाचा प्रचंड प्रतिसाद
प्रचाराची सुरुवात इंदिरा नगर भागातून भव्य रॅलीने झाली.
ढोल-ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. रॅलीचा समारोप कॉर्नर सभेत झाला. औरंगाबादच्या विकासासाठी एक नवी संधी देण्याच्या उद्देशाने स्थानिक नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी या रॅलीत मोठी गर्दी केली होती.






