Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ सुजात आंबेडकरांच्या हस्ते प्रसिद्ध

mosami kewat by mosami kewat
January 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबाद मनपा निवडणूक: वंचित बहुजन आघाडीचा ‘बहुजनांचा जाहीरनामा’ सुजात आंबेडकरांच्या हस्ते प्रसिद्ध
       

औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘बहुजनांचा जाहीरनामा’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात शहराच्या सर्वांगीण विकासाचा शब्द देण्यात आला असून, सत्ता आल्यास शहराला २४ तास पाणी पुरवठा आणि महापालिका शाळांमध्ये ‘केजी टू पीजी’ (KG to PG) मोफत शिक्षण देण्याचे महत्त्वाचे आश्वासन देण्यात आले आहे.

भीमनगर भावसिंगपुरा येथील जाहीर सभेत पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात जनतेच्या मूलभूत प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले आहे:

१) नवीन पाणी पुरवठा योजना तात्काळ मार्गी लावून शहराला २४ तास पाणी देणार

२) महापालिकेच्या शाळांतून पदव्युत्तर स्तरापर्यंत (KG to PG) मोफत शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा

३) अतिक्रमणात पाडण्यात आलेल्या घरांच्या बदल्यात नवीन घरे बांधून देणार. झोपडपट्टी निर्मूलन करून रहिवाशांना जमिनीचे मालकी हक्क (पट्टे) देणार

 ४) महिला सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ व सुलभ कर्ज उपलब्ध करून देणार.

५) शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संवर्धनाचे काम हाती घेऊन पर्यटनाला चालना देणार.

इतर सुविधा: कर रचनेत सुधारणा, ई-गव्हर्नन्सवर भर, सार्वजनिक वाहतूक आणि स्वच्छता या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करणार.

६२ उमेदवारांना संधी; सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व

पक्षाच्या निरीक्षक अरुंधती शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, वंचित बहुजन आघाडीने यावेळी ६२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न तिकिट वाटपात करण्यात आला असून, यामुळे जनतेतून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

तिकीट वाटपात भाजपने मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाइं) डावलल्यामुळे आंबेडकरी जनतेत संताप आहे. भाजपला धडा शिकवण्यासाठी रिपाइंचे काही पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत. “रिपाइंने जाहीर पाठिंबा दिल्यास आम्ही त्याचे स्वागत करू,” असे मत जिल्हाध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे यांनी व्यक्त केले.

शहरात सध्या वंचितच्या वतीने पदयात्रा, कॉर्नर मीटिंग आणि सभांचे सत्र सुरू आहे. अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची आमखास मैदानावर भव्य सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर राहुल मुगदल, सांडू श्रीखंडे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: Aurangabad municipal corporation electiondevelopmentElectionMaharashtrapoliticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivoter
Previous Post

११४ बंद मराठी शाळा पुन्हा सुरू होणार! मुंबईच्या शिक्षणात ‘वंचित’चा क्रांतीकारक बदल; जाहीरनामा प्रसिद्ध

Next Post

एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात – सुजात आंबेडकर

Next Post
एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात - सुजात आंबेडकर

एमआयएमच्या पतंगाची दोर फडणवीसांच्या हातात - सुजात आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
Uncategorized

प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव उधळून लावा – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

by mosami kewat
January 9, 2026
0

पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा पुणे : छोट्या व प्रादेशिक पक्षांना फोडून त्यांना कमकुवत करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने...

Read moreDetails
चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा

चीनसारखी एकाधिकारशाही भाजपला भारतात आणायची! ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा

January 9, 2026
महू नगर, राहुल नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावती दौरा; ‘वंचित’च्या उमेदवारांसाठी प्रत्यक्ष जनसंवाद

महू नगर, राहुल नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावती दौरा; ‘वंचित’च्या उमेदवारांसाठी प्रत्यक्ष जनसंवाद

January 9, 2026
मुंबई महापालिका निवडणूक: आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी 'वंचित'ला साथ द्या; मुंबईत प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा एल्गार

मुंबई महापालिका निवडणूक: आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी ‘वंचित’ला साथ द्या; मुंबईत प्रा. अंजलीताई आंबेडकरांचा एल्गार

January 9, 2026
सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये 'वंचित'ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत प्रभाग १७ मध्ये ‘वंचित’ची भव्य रॅली; जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

January 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home