Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद मनपा निवडणूक : प्रभाग ८ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसागर, सुजात आंबेडकरांचा विकासाचा नारा

mosami kewat by mosami kewat
January 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
औरंगाबाद मनपा निवडणूक : प्रभाग ८ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसागर, सुजात आंबेडकरांचा विकासाचा नारा
       
औरंगाबाद : आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रचाराला वेग दिला असून प्रभाग क्रमांक ८ आंबेडकर नगर येथे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला.

प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या रॅलीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी देण्याचे आवाहन केले. “शहराचा आणि नगरांचा खरा विकास साधायचा असेल, तर हक्काचे आणि सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारे उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे विकासासाठी कटिबद्ध असून, त्यांना विजयी करा,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या रॅलीत तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह विविध समाजघटकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. ‘एक संधी विकासासाठी’, ‘वंचितला संधी द्या’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. औरंगाबादमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह आणि अपेक्षा दिसून आल्या.

या प्रचार रॅलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निवडणुकीत शहरात राजकीय बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Aurangabad municipal corporation election newsElectionMaharashtrapoliticsSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन!

Next Post

संभाजी आणि चिस्तीया कॉलनीत सुजात आंबेडकरांचा भव्य रोड शो; प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे जंगी शक्तीप्रदर्शन!

Next Post
संभाजी आणि चिस्तीया कॉलनीत सुजात आंबेडकरांचा भव्य रोड शो; प्रभाग ११ मध्ये ‘वंचित’चे जंगी शक्तीप्रदर्शन!

संभाजी आणि चिस्तीया कॉलनीत सुजात आंबेडकरांचा भव्य रोड शो; प्रभाग ११ मध्ये 'वंचित'चे जंगी शक्तीप्रदर्शन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home