Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन!

mosami kewat by mosami kewat
January 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन!
       
औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला असून, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक ७, सिद्धार्थ नगर येथे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळ आहे.

 “शहराच्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आता हक्काच्या उमेदवारांना निवडून देण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी यावेळी केले.

प्रचंड जनसमुदायासह शक्तीप्रदर्शन

सिद्धार्थ नगर परिसरात काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. रॅलीच्या सुरुवातीपासूनच हजारो नागरिक यात सहभागी झाले होते. ‘एकच संधी वंचितला’ अशा घोषणांनी संपूर्ण प्रभाग दणाणून गेला होता. ही रॅली केवळ प्रचाराचे साधन न ठरता वंचित बहुजन आघाडीच्या शक्तीप्रदर्शनात रूपांतरित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रॅलीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी विविध ठिकाणी ‘कॉर्नर सभा’ घेतल्या. या सभांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधला. “वर्षानुवर्षे केवळ आश्वासनं देणाऱ्यांना बाजूला सारून, आता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,” असे त्यांनी नमूद केले.

प्रभागातील रस्ते, पाणी आणि मूलभूत सोयीसुविधांचा अभाव यावर भाष्य करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, शहराचा विकास करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी हाच सक्षम पर्याय आहे. औरंगाबादकरांनी आता बदल घडवण्याचा निर्धार केला असून, या रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हे त्याचेच निदर्शक आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: aurangabadElectionMaharashtraSujat Ambedkar
Previous Post

‘राजगृह’ येथून घुमला उपेक्षितांचा आवाज; प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचा ‘लोकसंकल्प’ जाहीरनामा प्रसिद्ध!

Next Post

औरंगाबाद मनपा निवडणूक : प्रभाग ८ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा जनसागर, सुजात आंबेडकरांचा विकासाचा नारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह
बातमी

कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

by mosami kewat
July 11, 2026
0

नवी दिल्ली : देशभरात गटारे आणि सेप्टिक टँक साफ करताना होणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या मृत्यूंची संख्या २०२६ मध्ये चिंताजनकरीत्या वाढली आहे....

Read moreDetails
कॉर्पोरेटचे कार्टेल आणि मायक्रो-उद्योजकांचा चक्रव्यूह

कॉर्पोरेटचे कार्टेल आणि मायक्रो-उद्योजकांचा चक्रव्यूह

July 11, 2026
हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे

हिंगोलीला भूकंपाचा जोरदार हादरा; ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये घबराट, घरांना तडे

July 11, 2026
धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन

धमक्यांना घाबरणार नाही! दादा भुसेंच्या पोस्टरला काळे फासत मुंबईत सम्यक विद्यार्थ्यांचे आंदोलन

July 11, 2026
राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

July 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home