Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘राजगृह’ येथून घुमला उपेक्षितांचा आवाज; प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचा ‘लोकसंकल्प’ जाहीरनामा प्रसिद्ध!

mosami kewat by mosami kewat
January 8, 2026
in बातमी
0
‘राजगृह’ येथून घुमला उपेक्षितांचा आवाज; प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचा ‘लोकसंकल्प’ जाहीरनामा प्रसिद्ध!
       

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. गुरुवारी, ८ जानेवारी रोजी दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी पक्षाचा अधिकृत निवडणूक जाहीरनामा दिमाखात प्रसिद्ध करण्यात आला. 

‘लोकआवाज, लोकसंकल्प, लोकशक्ती’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यातून मुंबईतील सामान्य आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

या ऐतिहासिक जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याला वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये प्रा. अंजलीताई आंबेडकर (राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थ मोकळे (राज्य उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते), चेतन अहिरे (मुंबई अध्यक्ष), स्नेहल सोहनी (महिला आघाडी मुंबई अध्यक्ष), सागर गवई (मुंबई युवा अध्यक्ष) यांची उपस्थिती होते. तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली होती. 

जनतेच्या वेदनांचा थेट दस्तऐवज

वंचित बहुजन आघाडीने हा जाहीरनामा तयार करताना एक वेगळी पद्धत अवलंबली आहे. हा मसुदा कोणत्याही बंद खोलीत बसून तयार केलेला नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर, वस्त्यांमध्ये, चाळीत, झोपडपट्ट्यांमध्ये आणि लोकांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन केलेल्या संवादातून हा जाहीरनामा साकारला आहे.

मुंबईकरांच्या दैनंदिन संघर्षाचा आणि आकांक्षांचा हा थेट प्रतिबिंब असल्याचे नेत्यांनी यावेळी नमूद केले.

जाहीरनाम्यात ज्यांच्या श्रमावर मुंबई चालते, त्यांच्या हक्कांच्या तरतुद, सुरक्षा, शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी, सामाजिक न्याय आणि हक्कांचे संरक्षण, ड्रेनेज, शुद्ध पाणी आणि दर्जेदार आरोग्याचा अधिकार, ज्यांचा आवाज प्रस्थापित राजकारणात नेहमी दडपला जातो, त्यांचा बुलंद ‘लोकआवाज’ बनून वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिकेत उतरली आहे,” असा विश्वास यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केला.


       
Tags: Anjali AmbedkarElectionMaharashtraMumbai.dadarpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

जनसागर उसळला : प्रभाग २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीची शक्तीप्रदर्शन; अंजलीताई आंबेडकरांची जाहीर  सभा उत्साहात

Next Post

सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन!

Next Post
सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे आवाहन!

सिद्धार्थ नगरमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात; औरंगाबादच्या विकासासाठी 'वंचित'ला संधी देण्याचे आवाहन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

by mosami kewat
May 9, 2026
0

मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन...

Read moreDetails
ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

May 8, 2026
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

May 7, 2026
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

May 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home