Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भाजपचा पराभव करून त्यांना घरी बसवा; सोलापूरच्या सत्तेसाठी सुजात आंबेडकरांचे ‘व्हिजन २०२६’ सादर

mosami kewat by mosami kewat
January 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
भाजपचा पराभव करून त्यांना घरी बसवा; सोलापूरच्या सत्तेसाठी सुजात आंबेडकरांचे ‘व्हिजन २०२६’ सादर
       

सोलापूर : “भाजपने आतापर्यंत कोणतेही विकासकाम केलेले नाही, फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याचे काम केले आहे. सोलापूर शहराची आजची दुरवस्था या प्रस्थापितांमुळेच झाली आहे. आता वेळ आली आहे की, भाजपचा पराभव करून त्यांना घरी बसवावे आणि खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी,” असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडी चे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ, युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा आज झाली. वंचित बहुजन आघाडीने सोलापूर महानगरपालिकेसाठी कंबर कसली असून, आज दुपारी ३ वाजता सोलापूरमधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर (जुना बस डेपो) येथे पहिली जाहीर सभा पार पडली.

युवकांना ५० टक्के उमेदवारी

सुजात आंबेडकर म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ज्यांनी संघर्ष केला, त्यांनाच आम्ही उमेदवारी दिली आहे. गेल्या विधानसभेत ३६ तरुणांना संधी दिल्यानंतर, यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत आम्ही ५० टक्के उमेदवारी युवकांना दिली आहे. वडार, कैकाडी, लिंगायत, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम वंचितने केले आहे.”

वंचित बहुजन आघाडीचे ‘सोलापूर व्हिजन’:

१) प्रत्येक घराला नळ आणि नळाला पाणी देण्याचे काम केले जाईल.

२) ३०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारून प्रत्येक प्रभागात एक प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले जाईल

३) सरकारी शाळांना सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण व सोयी-सुविधा देऊन मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल

४) एमआयडीसी पुन्हा सुरू करून पाच हजारांहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल

प्रस्थापितांनी सोलापूरला लुटले – सोमनाथ साळुंखे

राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी स्थानिक नेत्यांवर टीका करताना म्हटले की, “ज्या प्रतिनिधींना तुम्ही निवडून दिले, त्यांनी केवळ कंत्राटे मिळवून आपली संपत्ती गोळा केली. आज शहरात पाणी, आरोग्य आणि शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आता पर्याय केवळ वंचितच आहे.”

तीन महिन्यात पाणी प्रश्न सोडवणार – डॉ. नितीन ढेपे

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडी हा रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष आहे. आमची सत्ता आल्यास केवळ तीन महिन्यांच्या आत सोलापूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दररोज पाणीपुरवठा केला जाईल.”

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अधिकृत उमेदवारतआयोजित भव्य जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: developmentEducationElectionMaharashtraMunicipal corporation electionpoliticssolapurSolapur electionSolapur municipal corporation electionSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

भीमसैनिक सोहम लोंढे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची मोठी हानी; सुजात आंबेडकरांनी घेतली सांत्वनपर भेट

Next Post

संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला सत्तेबाहेर फेका – सुजात आंबेडकरांचा लातूरमध्ये एल्गार

Next Post
संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला सत्तेबाहेर फेका – सुजात आंबेडकरांचा लातूरमध्ये एल्गार

संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपला सत्तेबाहेर फेका - सुजात आंबेडकरांचा लातूरमध्ये एल्गार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home