Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करा; वंचित युवा आघाडी आक्रमक

mosami kewat by mosami kewat
January 3, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांवर ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल करा; वंचित युवा आघाडी आक्रमक
       
अकोला : मध्यप्रदेशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची जाळपोळ करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर राष्ट्रविरोधी कलमान्वये (UAPA) कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अकोला पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.

मध्यप्रदेश राज्याच्या हद्दीत काही समाजविघातक घटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाळण्याचे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय कृत्य केले. या घटनेचे तीव्र पडसाद अकोल्यात उमटले असून, वंचित बहुजन युवा आघाडीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. (Mumbai protest)

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नसून ते भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्यांचा अपमान करणे हा लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे,” अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. ही घटना “मनुवादी” प्रवृत्तीतून आणि दलित स्वाभिमानाबद्दलच्या द्वेषातून घडली असून, हे देशाच्या विभाजनाचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

“प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेशिवाय असे धाडस करणे शक्य नाही. जर अशा राष्ट्रविरोधी घटकांवर तात्काळ कारवाई झाली नाही, तर याकडे सरकारी संमती म्हणून पाहिले जाईल.” असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेगारांवर ‘राष्ट्रविरोधी क्रियाकलाप कायदा’ (UAPA) आणि ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. (Mumbai protest)

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे पाटील आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.

यावेळी वैभव खडसे (महानगर अध्यक्ष), सुगत डोंगरे (बाळापूर तालुका अध्यक्ष), जय तायडे (माजी महानगर अध्यक्ष), आकाश जंजाळ (प्रसिद्धी प्रमुख), सूरज दामोदर (मीडिया प्रमुख), रवि गीते, अमोल वानखडे (उपाध्यक्ष), विजय डोंगरे, शेट्टी डोंगरे, सचिन डोंगरे, आदेश उमाळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Mumbai protest)

Tags: ActrocityConstitutioncrimeDr Babasaheb AmbedkarFIRMadhya PradeshMaharashtraManusmritiNakoSamvidhanHawamumbaipolicepoliticsprotestrightsstatueVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या मनुवाद्यांना धडा शिकवा; महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देणार नाही

Next Post

पुणे महापालिका निवडणूक : मतदारांना प्रलोभन दाखवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे यांच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

by mosami kewat
May 9, 2026
0

मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन...

Read moreDetails
ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

May 8, 2026
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

May 7, 2026
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

May 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home