Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळा: ३१ डिसेंबरपासून पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या वाहतुकीत मोठे बदल

mosami kewat by mosami kewat
December 26, 2025
in Uncategorized
0
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळा: ३१ डिसेंबरपासून पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या वाहतुकीत मोठे बदल

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळा: ३१ डिसेंबरपासून पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या वाहतुकीत मोठे बदल

       

पुणे : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2026 रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२६ रोजी कोरेगाव भीमा येथील ‘जयस्तंभास’ अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. येणाऱ्या अनुयायींची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वाहतुकीत बदल केले आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येत्या बुधवारी (दि.31 डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

कोरेगाव भीमा-पेरणे (ता. हवेली) येथे 1 जानेवारी 2026 रोजी 208 वा शौर्यदिन साजरा होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने जयस्तंभाला भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि जयस्तंभाच्या सजावटीमध्ये राजमुद्रा दिसणार आहे. एकूणच कोरेगाव भीमा जयस्तंभास यावर्षी विशेष सजावट होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीची नांदेडमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन

भीमा कोरेगाव येथे ‘विजस्तंभ अभिवादन’ सोहळ्यासाठी देशभरातून वेगवेगळ्या भागांतून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित येतात. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता बुधवारी दुपारपासून नगर रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. नगर रस्त्यावरील वाहतूकबदल एक जानेवारी 2026 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरूरकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 8 पान 2 वर येथे वाहने पार्क करता येणार विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुनायांसाठी प्रशासनाने वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत.

अवजड वाहनांना असेल बंदी

शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकीतील हॅरीस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधीमल राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीत मंतरवाडी फाटा, मरकळ पूल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

…पाहा असा आहे वाहतूकबदल

पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळे फाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जावे.


       
Tags: Dr Babasaheb AmbedkarKoregaon Bhima 2026MaharashtrapunePune-Ahilyanagar HighwayTrafficvbaforindia
Previous Post

‘प्रबुद्ध भारत’ला १० हजारांची देणगी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळा: ३१ डिसेंबरपासून पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या वाहतुकीत मोठे बदल
Uncategorized

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळा: ३१ डिसेंबरपासून पुणे-अहिल्यानगर महामार्गाच्या वाहतुकीत मोठे बदल

by mosami kewat
December 26, 2025
0

पुणे : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2026 रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२६ रोजी...

Read moreDetails
‘प्रबुद्ध भारत’ला १० हजारांची देणगी

‘प्रबुद्ध भारत’ला १० हजारांची देणगी

December 26, 2025
छत्तीसगडमध्ये मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दलाची तोडफोड; कर्मचाऱ्यांची जात-धर्म विचारून हल्ला

छत्तीसगडमध्ये मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दलाची तोडफोड; कर्मचाऱ्यांची जात-धर्म विचारून हल्ला

December 25, 2025
पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; उद्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; उद्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

December 25, 2025
पुण्यात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘भारतीय स्त्री मुक्ती परिषद’ संपन्न; मनुस्मृती दहन दिनानिमित्त विचारांचा जागर

पुण्यात वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे ‘भारतीय स्त्री मुक्ती परिषद’ संपन्न; मनुस्मृती दहन दिनानिमित्त विचारांचा जागर

December 25, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home