मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील महत्त्वाचे फेरबदल करत माणिकराव कोकाटे यांची खाती काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पाठवलेल्या पत्राला राज्यपालांनी मंजुरी दिली असून, कोकाटे यांच्याकडील खाती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. कोकाटे यांच्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम राहिल्यास अजित पवार माणिकराव कोकाटे यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करतील.





