राजेंद्र पातोडे
“पीएचडी करून काय दिवे लावणार?” हा प्रश्न नाही, ही मनुवादी विचारणा २०२३ ला सभागृहात सभागृहात करून २०२५ ला — “पैसे मिळतात म्हणून एकाच कुटुंबातील पाच-पाच जण पीएचडी करतात” अशी टीका अजित पवारांनी केली आहे.आपण लोकप्रतिनिधी आहोत, पब्लिक सर्व्हंट आहोत, मालक नाही ह्याचे भान विसरून काल त्यांनी गरळ ओकली आहे.
राज्यात ६५,००० मराठी शाळा बंद, ११,००० प्राध्यापक पदे रिक्त, विद्यापीठांत ६०% शिक्षक नाहीत, अनुसूचित जाती जमाती व ओबीसी शिष्यवृत्ती ३ वर्षे मिळत नाही, महाज्योती–बार्टी–सारथीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप २ वर्षे अडवलेली आहे हा दोष कुणाचा आहे विद्यार्थ्यांचा की सत्ताधारी पक्षाचा?
एकीकडे एकदा आमदार म्हणून निवडून आले किंवा विधान परिषद सदस्य झाले की आयुष्यभर ५० किंवा ५२ हजार दरमहा पेन्शन! राज्यात जवळ जवळपास ९०० माजी आमदार आहेत. त्यांचे साठी ५४ कोटी वार्षिक खर्च सरकार करते ! त्यांनी काय दिवे लावले आहेत?सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार अध्यक्ष असलेल्या शाळा महाविद्यालयात अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांना आरक्षण आणि सवलती नाही.
तरीही शरद पवार पुरोगामी आहेत ?दुसरीकडे संशोधक आणि संशोधन ह्याचा उपहास, विद्यार्थ्यांना उपाशी ठेवणारी व्यवस्था, ज्ञानाला “फालतू” ठरवणारी अजित पवारांची भाषा हा सत्तेचा माज आहे.
बरं हि भाषा कुणाची आहे?ज्यांच्या घरात पिढ्यान्पिढ्या सत्ता आहे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार हे एकाच कुटुंबातील खासदार आमदार आणि मंत्री आहेत.
एकाच कुटुंबातील पाचजण ! त्यावर काही निर्बंध घालणार आहेत का?लक्षात ठेवा की विद्यार्थी हे देशाची संपत्ती आहेत, तुमचे गुलाम नाहीत.शिक्षण आणि पायाभूत सुविधा देणे सरकारची घटनादत्त जबाबदारी आहे, मेहरबानी नाही.






