नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेतील एक महत्त्वपूर्ण सभा मुदखेड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उस्फुर्त प्रतिसाद दिला.

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे झालेल्या या जाहीर सभेसाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी सुजात आंबेडकर यांनी यावेळी उपस्थितांना आवाहन केले.
विकासासाठी हक्काचा प्रतिनिधी निवडावा
यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी नागरिकांना विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. “वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या प्रत्येक स्थानिक समस्येवर लक्ष केंद्रित करून ती सोडवण्यासाठी काम करेल. आपले हक्काचे प्रतिनिधी निवडून देण्यासाठी जनतेने प्रस्थापितांना नाकारून वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीला मत दिल्यास आपल्या भागातील विकासकामे मार्गी लागतील आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करणारा प्रतिनिधी मिळेल, असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला.
या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अविनाश भोसीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






