नाशिक : नांदूर नाका येथे वडार समाज रक्षक राजू अण्णा धोत्रे यांच्यासह शेकडो वडार समाजातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये (VBA) जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढल्याचे चित्र आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनिल जाधव यांनी जातीचे दाखले, रोजगार, आणि वडार समाजातील होणारे अन्याय-अत्याचार यांसारख्या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी वडार समाजाचे नेते म्हणून घेणाऱ्या पण केवळ स्वार्थासाठी समाजातील तरुण पिढीचा वापर करून घेणाऱ्या नेत्यांवर टीका केली.
जाधव यांनी कार्यकर्त्यांना आपला समाज म्हणून एकत्र या’ असे आवाहन केले. ‘समाज म्हणून एकत्र आलात तर आपल्या समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, सम्यक विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, विलास लक्ष्मण गुंजाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.





