उल्हासनगर : भारतीय बौद्ध महासभा, उल्हासनगर तालुका यांच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राष्ट्रीय नेत्या आणि मार्गदर्शिका आदरणीय अंजली आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थिती दर्शवली.
यावेळी अंजली आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याचे महत्त्व विशद केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये अँड. एस.के. भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सुषमा पवार केंद्रीय महिला प्रमुख, बी.एच. गायकवाड राष्ट्रीय सचिव, यु.जी. बोराडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, विजय गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष, शिला तायडे ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष, रोशन पगारे उल्हासनगर तालुका अध्यक्ष, संदीप उबाळे महासचिव, रूपेश हुंबरे सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते, मनोज पवार वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष, उज्ज्वल महाले (उल्हासनगर), आणि शेषराव वाघमारे पूर्व अध्यक्ष (उल्हासनगर) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल तालुका अध्यक्ष रोशन पगारे आणि महासचिव संदीप उबाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि ३६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.





