मुंबई : संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला, 25 नोव्हेंबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार असून त्यांच्या भाषणाची उत्सुकता कार्यकर्ते व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे.

मुंबई शहरात या महासभेची जय्यत तयारी सुरू असून विविध महत्त्वाच्या चौकांत व प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात बॅनर व फलक लावण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांतही उत्साह ओसंडून वाहत आहे.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व स्वयंसेवक सतत बैठका घेत आहेत. लोकशाही, संविधान मूल्ये आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार असल्याने ही सभा विशेष महत्त्वाची ठरणार आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक, तरुण व महिलांची उपस्थिती अपेक्षित असून वातावरणात उत्साहाचे संचार झाले आहे.






