Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

वंचित बहुजन आघाडीचा ऐतिहासिक निर्णय; पारलिंगी उमेदवाराला निवडणुकीत उमेदवारी!

mosami kewat by mosami kewat
November 21, 2025
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीचा ऐतिहासिक निर्णय; पारलिंगी उमेदवाराला निवडणुकीत उमेदवारी!
       
जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. पक्षाने फैजपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी पारलिंगी कार्यकर्ती शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हा निर्णय केवळ फैजपूरसाठीच नव्हे, तर राज्यातील पारलिंगी समाजाच्या राजकीय समावेशनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

शमिभा पाटील या फैजपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 9 ब मधून नगरसेविका म्हणून निवडणूक लढवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने ‘जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी’ या उद्देशाने त्यांनी ही उमेदवारी दिली आहे. यातून वंचित बहुजन आघाडीने समाजात दुर्लक्षित असलेल्या ‘वंचित’ घटकांना राजकीय प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.

शमिभा पाटील यांची पार्श्वभूमी –

शमिभा पाटील या केवळ राजकीय उमेदवार नसून,  सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.  त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मराठी विषयात पदव्युत्तर पदवीधर (Postgraduate) आहेत आणि २००७ पासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. 

विशेष म्हणजे त्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मध्ये अतिथी प्राध्यापिका (Guest Faculty) म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी रावेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मानवी हक्कांसाठी त्या लढत आहेत आणि राजकीय पक्ष नेहमीच दुर्लक्ष करत असलेल्या ‘वंचित’ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वंचित बहुजन आघाडीने शमिभा पाटील यांना तिकीट देऊन केवळ पारलिंगी व्यक्तीला संधी दिली नाही, तर समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी पक्ष कार्यरत असल्याचे दाखवून दिले आहे.

Tags: ElectionjalgaonLoacal body electionMaharashtraShamibha PatilVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये गोल्ड मेडल जिंकले!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा ऐतिहासिक निर्णय; पारलिंगी उमेदवाराला निवडणुकीत उमेदवारी!
Uncategorized

वंचित बहुजन आघाडीचा ऐतिहासिक निर्णय; पारलिंगी उमेदवाराला निवडणुकीत उमेदवारी!

by mosami kewat
November 21, 2025
0

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. पक्षाने फैजपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी...

Read moreDetails
स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये गोल्ड मेडल जिंकले!

स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 मध्ये गोल्ड मेडल जिंकले!

November 21, 2025
बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!

बांधकाम कामगार श्रमिक सेना ‘वंचित बहुजन आघाडी’मध्ये!

November 20, 2025
संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

संविधान सन्मान महासभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : भारतीय बौद्ध महासभा

November 20, 2025
प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

November 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home