मुंबई : बौद्ध समाज संवाद दौरा संपूर्ण मुंबई शहरात मोठ्या उत्साहात सुरू आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले नगर, नवरंग मित्र मंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पंचशीलाचे पठण करून बौद्ध मूल्यांचा सन्मान ठेवत संवाद सत्राला प्रारंभ झाला.

संवादादरम्यान बुद्ध बांधवांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व स्थानिक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. उपस्थितांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली. त्यांनी मांडलेली भूमिका व मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणा निर्माण झाली.

कार्यक्रमाला प्रमुख मुंबई प्रदेश वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्षा स्नेहल सोहनी, विश्वास भाऊ सरदार, मुंबई प्रदेश महासचिव, जानराव गुरुजी, भारतीय बौद्ध महासभा बुद्धचारी तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आणि मोठ्या संख्येने बुद्ध बांधव उपस्थित होते.






