आंबेजोगाईमध्ये सुजात आंबेडकर यांची प्रभार सभा!
बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने विजयाचा निर्धार व्यक्त करत आंबेजोगाईत भव्य जाहीर सभा घेतली. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंबेजोगाई नगरपरिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन शंकर सरवदे आणि मुद्रीकाबाई पतीराज जोगदंड यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली.
सभा संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले, “आता आरक्षणवादी, संविधानवादी जनतेने आपल्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जागरूक होण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना विजयी करा.”
वंचित बहुजन आघाडीने लढाऊ, कार्यक्षम आणि जनतेतून उभे राहिलेले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. “या लढणाऱ्या कार्यकर्त्यांना विजयी करा आणि स्वतः सत्तेचे वाटेकरी बना,” असेही आवाहन त्यांनी केले.
सभेला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, पूर्व जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, तसेच आंबेजोगाई व बीड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेमुळे आंबेजोगाई परिसरात निवडणुकीचे तापमान चांगलेच चढले असून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार मोहीमेला मोठी गती मिळाल्याचे चित्र दिसून आले.






