पुणे : कोथरूड येथे तीन अल्पवयीन मुलींच्या पोलीस छळ प्रकरणात अखेर पुणे आणि औरंगाबाद येथील संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या न्याय मिळवण्याच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने (VBA) बजावलेली महत्त्वाची भूमिका अनेक प्रमुख माध्यमांनी त्यांच्या बातम्यांमधून वंचित बहुजन आघाडीचे नाव वगळले आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावर पोस्ट करत माध्यमांना जाब विचारला आहे.
न्याय मिळेपर्यंत ‘वंचित’चा आयुक्तालयात ठिय्या –
या संवेदनशील प्रकरणात पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कायदेशीर आणि आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. ॲड. अरविंद तायडे (वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष) यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यात महत्त्वाची कायदेशीर बाजू सांभाळली.
पोलिसांनी पीडित मुलींची तक्रार त्वरित घ्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात पहाटे ३ वाजेपर्यंत ठिय्या. आंदोलन केले होते. तसेच स्वतः पक्षाचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुणे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, ‘कायदा हा कायदा असतो’, या शब्दांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या तीव्र दबावानंतर आणि पाठपुराव्यानंतर पुणे पोलिसांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
माध्यमांवर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप
@lokmat, @Matapune, @mataonline, @saamTVnews, @abpmajhatv, @LoksattaLive, @TV9Marathi, @NDTVMarathi, @SakalMediaNews
यांसारख्या अनेक प्रमुख माध्यमांनी बातमी दिली.
मात्र, या सर्व बातम्यांमधून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने दिलेला लढा, नेत्यांचा आयुक्तालयातील ठिय्या आणि ॲड. आंबेडकरांची मध्यस्थी पूर्णपणे वगळण्यात आले आहे. कोणत्याही पक्षाने या मुलींना न्याय देण्यासाठी पाठीशी उभे राहिले नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी ३ महिन्याच्या अथक पाठपुराव्यानंतर, कायदेशीर लढा लढला. आणि आरोपींवर गुन्हा दाखल झाला. या मागे वंचित बहुजन आघाडीचे केलेल्या कामाचे उल्लेख माध्यमाने वगळले. वंचित बहुजन आघाडीने या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. “माध्यमांनी निःपक्षपातीपणे वागले पाहिजे. ज्यांच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांवर गुन्हा दाखल झाला. त्यांचे नाव वगळणे हे अत्यंत निषेधार्ह आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.





