अकोला : आगामी नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी या वतीने नगराध्यक्ष पदासाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज, बुधवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केली.
जिल्हा समन्वयक माजी आमदार अॅड. नतिकोद्दिन खतीब यांच्या अध्यक्षतेखाली यशवंत भवन, अकोला येथे सकाळी १० वाजता पक्षाच्या निवड समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मोहनराव पाटील यांचा राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मोठा झटका! कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
या बैठकीत प्रामुख्याने बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, आणि मूर्तीजापुर नगरपरिषद/नगरपंचायत अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पक्षाने उमेदवारांची निवड केली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे –
१) बार्शिटाकळी नगरपंचायत : अखतर खातून अलीमोहिन
२) मूर्तीजापुर नगरपरिषद: शेख इम्रान शेख खलील
३) अकोट नगरपरिषद : स्वाती मंगेश चिखले
४) तेल्हारा नगरपरिषद : विद्या सिद्धार्थ शामस्कर






