नाशिक : गायक संदीप पवार यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. ‘किसी पिंजरे मे कैद ना होगा, ये तो खानदानी शेर है!’ या गाण्यामुळे चर्चेत असलेल्या संदीप पवार यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला (VBA) एक नवा चेहरा मिळाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्या हस्ते संदीप पवार यांचा पक्ष प्रवेश मनमाड येथे पार पडला. यावेळी पक्षाचे जिल्हा व शहर कमिटीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
“आम्ही पेपर टायगर नाही, आम्ही बाळासाहेबांचे तत्वनिष्ठ कार्यकर्ते” – तौफिक पठाण
गायक संदीप पवार यांनी आपल्या समाजकारण आणि राजकीय वाटचाली संदर्भात नवा टप्पा गाठला आहे. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवर भाष्य करणारे आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले संदीप पवार यांनी आता ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.






