मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरले असून, संपूर्ण क्रिकेट जगतासाठी हा एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण ठरला.
सलामीवीर स्मृती मंधाना आणि युवा शफाली वर्मा यांनी सुरुवातीलाच आफ्रिकन गोलंदाजांवर प्रहार करत शतकी भागीदारी केली. यामुळे मोठ्या स्कोअरचा पाया रचला गेला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मात्र मधल्या षटकांमध्ये चिवटपणे पुनरागमन करत भारताला 50 षटकांत 7 गडी गमावून 298 धावांवर रोखले. भारताकडून शफाली वर्मा (अर्धशतक) आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा (58 धावा) यांनी महत्त्वाची अर्धशतके झळकावली.
भारताची धावसंख्या 300 च्या जवळ नेत असताना, डावाच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात दीप्ती शर्मा रनआऊट झाली. या विकेटमुळे भारताला 299 चा आकडा गाठता आला नाही, पण तरीही आव्हान भक्कम होता.
दोन्ही संघांचे प्लेईंग इलेव्हन
भारतः हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणानी, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री.
दक्षिण आफ्रिकाः लॉरा वूल्वार्ट (कर्णधार), ताझमिन ब्रिट्स, एनेके बॉश, सुने लूस, मरिजन कॅप, सिनालो जाफ्ता, एनेरी डर्कसन, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, मसाबाता क्लास, तुमी सेखुखुने, नोंदुमिसो शांगासे, काराबो मेसो.





