अकोला : आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तेल्हारा, मुर्तीजापूर, अकोट, बाळापूर, हिवरखेड, पातूर नगरपरिषद तसेच बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व सदस्य पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे अकोला येथील पक्ष कार्यालय, टॉवर चौक येथे सुरू राहणार आहे.
आज पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालय गाठले. अकोला जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले.
नगराध्यक्ष आणि सदस्यपदांच्या आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, अकोला जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.