संजीव चांदोरकर
नोबेल शांतता पुरस्काराच्या निमित्ताने :
यावर्षीचा हा पुरस्कार मारिया मच्याडो याना कसा मिळाला आणि डोनाल्ड ट्रम्प याना कसा मिळाला नाही , या नावांच्या पलीकडे जाऊन प्रणाली समजून घेण्यासाठी उपयोग करूया
संभाव्य अंगावर येऊ शकणाऱ्यांसाठी
सर्वप्रथम या पोस्टमध्ये नैसर्गिक विज्ञानातील कामासाठी / संशोधनासाठी ….. उदा भौतिक , रसायन , जीव, अंतराळ इत्यादी दिले गेलेले नोबेल पुरस्कार आणि बिगर विज्ञान शाखांतील ……. उदा साहित्य , शांतता आणि अर्थशास्त्र इत्यादी यात फरक केला पाहिजे. खालील प्रतिपादने बिगर विज्ञान शाखांतील पुसरस्कारांसाठी लागू होईल
नोबेल आणि तत्सम अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्करांचे स्टेटस असे काही उंचावून ठेवले आहे की तो पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना सेमी देवत्व मिळू लागते.
जागतिक पुरस्कार म्हणजे सर्व जगातील संभाव्य उमेदवारांची छाननी करून, सर्व प्रकारचे शास्त्रीय निकष लावून एकाची निवड केली जाते म्हणजे त्या व्यक्तीचे कार्य एकमेवाद्वितीयच असले पाहिजे अशी प्रमेये आपल्या नकळत बिंबवली गेली आहेत
यामुळे नोबेल पुरस्कार समिती / संस्था यांचा असे बिगर वैज्ञानिक पुरस्कार देण्यामागील तत्कालीन अजेंडा झाकला जातो. यात तत्कालीन हा शब्द महत्वाचा आहे. जागतिक राजनैतिक , आर्थिक परिस्थिती प्रचंड बदलत असते. बदलत नाहीत ते जागतिक प्रस्थापित प्रणालीचे हितसंबंध ….. त्या हितसंबंधांना पूरक , तत्कालीन संदर्भ लक्षात घेतच पुरस्कार दिले जातात
सर्वात नजरेत भरणारे आहे अर्थशास्त्रासाठीचे पुरस्कार ; उदा मायक्रो फायनान्स उद्योग जगभर पसरवण्यासाठी मोहमंद युनूस याना नोबेल पुरस्कार देणे. अर्थशास्त्रातील पुरस्काराबद्दल नंतर कधीतरी
हे फक्त नोबेल पुरस्काराबाबत नाही
अचानक गरीब / विकसनशील देशातील तरुण मुली जागतिक विश्वसुंदरी म्हटल्या जाऊ लागल्या ; कारण जागतिक सौंदर्य प्रसाधने , फॅशन उद्योगाला मार्केट हवे असते. सर्वात मुख्य अजेंडा सुंदरतेची व्याख्या त्यांच्या साच्यात बसवणे
आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग / पतमानांकन संस्था कोणत्या देशाला आणि कोणत्या वेळी आणि कोणते पतमानांकन देतात याचा मागोवा ठेवा
आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत कोणत्या राष्ट्राला कोणत्या वेळी आणि किती मिळते याचा मागोवा ठेवा
ही यादी देखील वाढवता येईल
ही वैश्विक प्रणाली एकसंघ आणि जैविक पद्धतीने किती सूक्ष्म पातळीवर करते, सर्वांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, आपण कोणते शब्द, संकल्पना वापरणार याला कसा आकार देत असते याची नोंद घेऊया.
मुंबईतील नागरी समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा ‘लोकआवाज – लोकसंकल्प’ उपक्रम
मुंबई : मुंबईतील नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि त्यांच्यावरील उपाययोजना जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश विभागाने 'लोकआवाज – लोकसंकल्प'...
Read moreDetails