अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक २, अकबर प्लॉट, अकोट फैल परिसरात मुस्लिम समाजातील महिलांच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी महिलांनी अंजलीताई आंबेडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत करत हा समारंभ यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद सादिक ऊर्फ (गुड्डू भाई), शफिक शाह, मोहम्मद साहिल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या अथक प्रयत्नातून हा सत्कार सोहळा अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला माजी सभापती आकाश शिरसाट आणि कलीम खान पठाण
आदी उपस्थित होते.