अहिल्यानगर : शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या गाव प्रमुखांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित शेवगाव येथील बंधन लॉन्स येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख हे होते.
यावेळी प्रा किसन चव्हाण यांनी सखोल असे मार्गदर्शन करून, सोमवार दि 13 ऑक्टोबर रोजी आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यलयावर ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार रु मदत द्या तसेच अतिक्रमने कायम करा यासह अनेक मागण्यासाठी होणाऱ्या मोर्चासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या बैठकीला जिल्हाउपाध्यक्ष कल्याणराव भागवत, तालुका युवक अध्यक्ष ऑगस्टीन गजभिव,सुनील खंडागळे ,अरुण झांबरे, संतोष ढाकणे, बाप्पासाहेब उल्हारे ,सरपंच अशोक गायकवाड, सरपंच विठ्ठल जगदाळे, ज्ञानेश्वर म्हस्के ,सागर गरुड ,रोहिणीताई ठोंबे, दिगंबर बल्लाळ, सुरेश खंडागळे सुंदर आल्हाट, भारत मिसाळ, बाळासाहेब काळपुंड, गणेश पंडित ,अशोक लोंढे, देवदान कांबळे ,सुनील साळवे ,अरुण खर्चन ,लक्ष्मण मोरे सलीम जिलानी, रवींद्र निळ, महादेव जगधने, एकनाथ जगधने, नारायण सातपुते, बाळासाहेब लहासे, संतोष गरड रामभाऊ गुंजाळ अनिकेत गोसावी यांच्यासह तालुक्यातील मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.