मुंबई – महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज मुंबईत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे हा मोर्चा पार पडला.
मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्ध वारसा स्थळ असून त्यावर बौद्ध समाजाचाच हक्क असल्याचे ठामपणे सांगितले. सरकारने त्वरित निर्णय घेऊन हे अन्यायकारक अधिनियम रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, मुंबई महासचिव सतीश राजगुरू, महासचिव विश्वास सरदार यांच्यासह अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.
मोर्चादरम्यान घोषणाबाजी करून सरकारकडे मागण्यांचा धोपट पाडण्यात आला. कार्यकर्त्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.