
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या मायेचा महासागर आदरणीय अंजली ताई बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला शहरातील अंबिका माता मंदिर, सर्वोपचार रुग्णालय, अशोक वाटीका चौक,बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन परिसरात उघड्यावर झोपणाऱ्या गरीब गरजू लोकांना 200 ब्लॅंकेट चे वाटप कारण्यात आले.

यावेळी मा. समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट, महानगर अध्यक्ष कलीम खान पठाण, सागर खाडे, अतिश इंगळे, अमन खाडे, स्वप्नील शिरसाट, विशाल बनसोड, रितिक डोंगरदिवे, स्वप्निल दामोदर, शिवा वैरागळे आदी उपस्थित होते.
